अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : तिसरीत शिकणाऱ्या श्रेया सजन या मुलीचं हे सुंदर हस्ताक्षर पाहून चक्क जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तिचे कौतुक केलं आहे. ती राहुरीमधील कडूवस्ती या जिल्हा प्राथमिक शाळेत शिकते.
गेल्या काही दिवसांपासून सुंदर हस्ताक्षर असलेला श्रेयाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला बघता बघता हजारो लाईक्स आणि कमेंट मिळाल्या आहेत.
प्रिय श्रेया,
तुझे खूप खूप अभिनंदन! तुझे हस्ताक्षर स्पर्धेतील लिखाण सोशल मीडियावर पाहिले आणि तुझे खुप कौतुक वाटले. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरूर जप. तुझ्या भावी शैक्षणिक कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा! pic.twitter.com/xTk4I0pI12— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 6, 2020
राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तिसरीच्या इयत्तेत शिकणारी श्रेया सजन हिने जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत हे लिहिलं आहे.
शाईच्या पेनाने लिहिलेल्या हे पान सुंदर आणि वळणदार शब्दांनी गुंफल गेलं आहे. यातील एक एक अक्षर हे जणू मोत्यासारखं भासत आहे. यातील प्रत्येक शब्दाची ठेवण ही वेगवेगळी आणि नजरेस भरणारी अशी आहे.
अनेकांना शंका आली असेल की तिसरीच्या मुलीचे हस्ताक्षर एवढे सुंदर कसे असू शकते?
म्हणून श्रेयाचा तिच्या वडिलांनी काढलेला हा व्हिडीओ. 👍👌 pic.twitter.com/MaVVpBgsCQ— Prashant Dhumal (@prash_dhumal) February 5, 2020
जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत श्रेयाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानंतर श्रेयाच्या वडीलांनी तिचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला. यावर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलं आहे.
या नंतर श्रेयाच्या या अक्षराचे कौतुक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केलंय.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com