Ahilyanagar News : युवा दिनानिमित्त जिजाऊ महोत्सवाचे आयोजन

Published on -

Ahilyanagar News : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनानिमित्ताने रविवारी (दि. १२) केडगाव येथे जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी दिली.

जिजाऊ महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम व्यावसायिक किसन सातपुते ह्यांची निवड करण्यात आली आहे.

१२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद ह्यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून युवक – तरुणांना प्रेरणा देण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, लेखक नितीन थोरात, लेखक देवा झिंजाड, उद्योजक राजेंद्र शिंदे हे मार्गदर्शन करणार असून पद्मश्री पोपटराव पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख सचिन चोभे ह्यांनी दिली.

रविवार दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. मार्गदर्शनपर व्याख्यान सुरू होईल. तरी शहरातील अधिकाधिक युवक, तरुण आणि विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महादेव गवळी यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe