अल्पवयीन मुलीला परराज्यातून पळवून आणणाऱ्या युवकाला कर्जतमधून अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून आणलेल्या युवकाला कर्जत पोलिसांच्या मदतीने छत्तीसगड पोलिसांनी राशीन येथे अटक केली आहे.

अतुलसिंग चव्हाण (वय 19) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी चव्हाण सोशल मीडियाद्वारे एका मुलीबरोबर ओळख झाली होती.

त्याने मुलीस नागपूर येथून कर्जत येथे आणले होते. याप्रकरणी छत्तीसगडमधील जसपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान मुलीचा शोध घेण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरणेश्वर प्रतापसिंह व त्यांचे सहकारी कर्जतला आले होते. शहर व परिसरात पोलिसांकडून शोध सुरू होता.

गोपनीय माहितीवरून कर्जत पोलिसांनी राशीन येथून आरोपीला अटक केली. नंतर मुलीला ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपी व मुलीस छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe