कर्जत पोलिसांचा दारू अड्ड्यावर छापा ; हजारोंचा माल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- कर्जत तालुक्यातील कोरेगावनजीक सटवाई फाटा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करून दारुचा साठा जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, हॉटेल जय मल्हार, सटवाई फाटा, कोरेगाव येथे एक इसम हॉटेलच्या आडोशाला अवैध दारू विक्री करत आहे.

यादव यांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक मोरे यांना फोनद्वारे याबाबतची माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक मोरे व स्टाफ यांनी तात्काळ तेथे जाऊन खात्री केली असता

त्यांना एक इसम अवैध दारू विक्री करताना मिळून आला. त्याच्या ताब्यातील २२ हजार ६१६ रुपये किंमतीची देशी विदेशी दारू जप्त केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस शिपाई महादेव कोहक, गोवर्धन कदम, श्याम जाधव यांनी केली.