अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान हा प्रकार जामखेड तालुक्यात घडला आहे.
या प्रकरणी एका अज्ञात व्यक्ती विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून अज्ञात व्यक्ती विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथील इयत्ता दहावी मध्ये शिकत आसलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही दि. १४ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आपल्या रहात्या घरामधुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण हे करत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये