अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- श्रीरामपूर शहरातील बोरावके कॉलेज वार्ड नं. १ परिसरात राहणाऱ्या १६ वर्षाच्या विद्यार्थिनीला पळवुन नेण्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत सदर मुलीच्या आईने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर महिला ही घरकाम व मेस (खानावळ) चालवते.
गोंधवणी रोडवर राहणाऱ्या या महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे की, १७.१२.२०२० रोजी साडेदहाच्या सुमारास कुणीतरी अज्ञात इसमाने आपल्या मुलीस वार्ड नं.१, बोरावके कॉलेज परिसर येथुन पळवून नेले आहे.
सादर ३६ वर्षीय वयाच्या महिलेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई समाधान सुरवाडे हे करीत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com