Ahmednagar News : ४१ अल्पवयीन मुलींचे अपहरण, काहींचा ठावठिकाणाच नाही, १४ ते १७ वयोगटातील मुली अडकताय टुकार मुलांच्या जाळ्यात !

Published on -

Ahmednagar News : समाजातील नैतिकता अत्यंत बदलत चाललेली दिसते. मान मर्यादा, वाडवडिलांची इभ्रत आदी गोष्टी मुलींच्या दृष्टीने महतवाच्या असतात. परंतु अलीकडील काळात मुलींच्या काही गोष्टींनी पालकांची चिंता वाढत चालली आहे. काही रिपोर्टनुसार वर्षभरात ४१ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळालेली आहे. या यापैकी ३६ मुली सापडल्या आहेत परंतु त्यातील ५ मुलींचा मात्र अजूनही तपास लागलेला नाही. अल्पवयीन मुली टूकार मुलांच्या जाळ्यात अडकतानाच्या घटना घडत आहेत.

शाळा, महाविद्यालये, खासगी क्लास आदी ठिकाणी हे टुकार मुले मुलींना आपल्या जाळ्यात फसवताना दिसतात. त्यानंतर या मुली प्रेमाच्या आणाभाका, लग्नाचे आमिष, कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी आदी गोष्टींमुळे जाळ्यात अडकत नको त्या गोष्टींना बळी पडत असतात. या सर्व गोष्टी पालकांच्या चिंतेचं कारण ठरताना दिसत आहे.

अत्याचाराचे प्रमाणही वाढले

वर्षभरात ६ अल्पवयीन मुलींवर, तर १३ सज्ञान मुलींवर अत्याचार झाला असून वर्षभरात अल्पवयीन ४१ मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आलेली आहे. मागील वर्षभरात साधारण शंभरावर अल्पवयीन मुली जाळ्यात अडकल्या असल्या तरी इज्जत व प्रतिष्ठा आदींमुळे अनेक कुटुंबे पोलिसांची पायरी चढत नसल्याचे वास्तव आहे. १८ वर्षांपुढील मुलींनी किंवा विवाहितेने एखाद्याच्या प्रेमात पडून घर सोडल्यास त्या हरविल्याची फिर्याद तर तर अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची फिर्याद दाखल करून घेतली जाते.

एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास तर मोबाईलही ठरतोय मोठे कारण !

हल्ली एकत्र कुटुंब पद्धतीचा संपूर्ण ऱ्हास होत चालेल आहे. पूर्वी एकत्र कुटुंब असल्याने कुटुंबातील व्यक्तींचा धाक, सहवास, दडपण असायचे. पण हल्ली कुटुंब छोटे झाल्याने मुला-मुलींच्या भावनिक गरजा पूर्ण होत नाहीत. अशी मुले मोबाईलच्या आहारी जातात. इंटरनेटच्या व सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराने पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण वाढले असून त्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टींना मुले, मुली बळी पडताना दिसतात.

काय खबरदारी घ्यावी?

पालकांनी आपल्या पाल्यांशी मनमोकळा संवाद ठेवत त्यांना संस्कारी करावे. मोबाईलचा वापर टाळण्यावर भर दिला पाहिजे. आपल्या पाल्यांच्या मित्र-मैत्रिणी कोण आहेत याबाबत देखील पालकांना माहिती पाहिजे. मुलांशी एक मित्रत्वाचे नाते ठेवत सर्व चौकशी करत राहिले पाहिजे. शाळा, शिक्षक आदी ठिकाणी सर्व लक्ष ठेवले पाहिजे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News