बसस्थानक परिसरातून तरुणीचे अपहरण ; सकल हिंदू समाज आक्रमक, पोलिसांना दिला ‘हा’ इशारा

Published on -

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील एका तरुणीचे घारगाव बसस्थानक परिसरातून अपहरण करण्यात आले आहे. या तरुणीचे अपहरण करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांत अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी. अन्यथा पठारभागातील सकल हिंदू समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सकल हिंदू समाजाने पोलिसांना दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील १९ वर्षांची तरुणी बेपत्ता झाली असल्या बाबत घारगाव पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आलेली आहे.

मात्र स्थानिक नागरिकांनी सदरची तरुणी बेपत्ता झाली नसून तिचे अपहरण करण्यात आले असल्याचा आरोप केला आहे.

याबाबत घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, की आंबीखालसा येथील त्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. यात शादाब रशीद तांबोळी, लाहीर शेख, जावेद शेख, कुणाल विठ्ठल शिरोळे यांनी दि.७ जुलै, २०२४ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घारगाव बसस्थानक परिसरातून तरुणीचे अपहरण केले आहे.

संघटितपणे हा गुन्हा केला आहे. त्यांचा म्होरक्या युसूफ चौगुले नावाचा इसम असून हा व्यक्ती तरुणांना गुन्हेगारीस करत प्रवृत्त करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पठारभागातील काही तरुण सर्रासपणे गावठी कट्टे वापरतात. त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात यावी. अपहरण झालेल्या तरुणीचा त्वरीत शोध घेऊन तिचे अपहरण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. पोलिसांनी याबाबत तात्काळ कारवाई न केल्यास सकल हिंदू समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढून घारगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सकल हिंदू समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

दरम्यान आंबीखालसा येथील १९ वर्षांची तरुणी बेपत्ता झाली असल्याच्या वृत्ताला उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दुजोरा दिला असून त्यानुसार सदर तरुणी ज्या तरुणासोबत गायब झाली आहे त्याच्या कुटुंबियांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. पोलीस तिचा निश्चितपणे शोध घेतील, असे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe