अमृतवाहिनीत रंगला पतंग महोत्सव, मा.मंत्री थोरात यांनीही घेतला पतंग उडवण्याचा आनंद ! अमृतवाहिनीत 10 हजार विद्यार्थ्यांच्या सहभागात पतंग महोत्सव

Ahmednagarlive24
Published:

गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत मेधा महोत्सव अंतर्गत मकर संक्रात निमित्त झालेल्या पतंग महोत्सवात सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत या भव्य दिव्य पतंग महोत्सवाचा आनंद लुटला. यावेळी मेधा महोत्सवाचा शुभारंभ बरोबर चांगल्या अभ्यासासाठी आणि जीवनासाठी माझी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

अमृतवाहिनीच्या शेती व शिक्षण विकास संस्थेच्या मेधा मैदानावर झालेल्या पतंग महोत्सवाच्या प्रसंगी माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात,संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात,युवा नेते राजवर्धन थोरात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी.धुमाळ, प्राचार्य डॉ.एम.ए.वेंकटेश, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ.मनोज शिरभाते, डॉ.बी.एम.लोंढे,सौ.जे.बी सेठी, शितल गायकवाड, अंजली कन्नावार, प्रा.जी.बी.काळे, विलास भाटे,डॉ.विलास शिंदे, प्रा.ईश्वर फापाळे, प्रा.अशोक वाळे, नामदेव गायकवाड, प्रा.विजय वाघे आणि सर्व विभाग प्रमुख व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अमृतवाहिनी मधील सर्व शाखांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी रंगबेरंगी पतंग आणून या मेधा महोत्सवात सहभाग घेतला. यामुळे संपूर्ण मैदानाच्या परिसरातील आकाश हे विविध पतंगांनी सजले होते.यामध्ये इयत्ता पहिली ते पोस्ट ग्रॅज्युएट असे सुमारे 10 हजार विद्यार्थी सहभागी झाले. मोठ्या आनंदाने नुकसान झालेल्या पतंग महोत्सवात उडी उडी जाय या गीतासह झालेल्या विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. निडो इंटरनॅशनल स्कूल, मॉडेल स्कूल इंटरनॅशनल स्कूलच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी धमाल केली. इंजीनियरिंग पॉलीटेक्निक, एमबीए,फार्मसी, आयटीआय च्या विद्यार्थ्यांनी उंच उंच पतंग उडवत या पतंग महोत्सवाचा आनंद घेतला यामधून प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मुंबईतील मल्हार महोत्सवाच्या धर्तीवर सुरू झालेल्या मेधा महोत्सवा राज्यातील मोठा सांस्कृतिक महोत्सव ठरला आहे.अमृतवाहिनी संस्थेने गुणवत्ता पूर्ण शिक्षणावर भर दिला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी मेधा महोत्सवातून त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. हा महोत्सव विद्यार्थ्यांसह सर्वांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला असून मागील प्रत्येक वर्षी चढत्या क्रमाने उत्साहात हा महोत्सव आपण केला आहे. या वेळेस ही मोठ्या आनंदाने मेधा महोत्सव होणार असून सर्वांनी कलागुणांबरोबर अभ्यासाकडे लक्ष द्यावे. अमृतवाहिनीचा विद्यार्थी हा गुणवत्तेने संपूर्ण जगात चमकला पाहिजे अशा शुभेच्छा ही त्यांनी दिल्या.

तर सौ.शरयू ताई देशमुख म्हणाल्या की, मेधा महोत्सवामध्ये कला, साहित्य ,क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम याचबरोबर विविध मान्यवरांची व्याख्याने ऐकण्याची मोठी संधी असते. हसत खेळत गुणवत्तापूर्ण घेण्यासाठी मेधा महोत्सव असून मेधा महोत्सवाची सर्व तयारी विद्यार्थ्यांनी केलेली असते. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला महोत्सव असे याचे स्वरूप असून यावर्षीच्या पतंग सर्वांचा सहभाग हा कौतुकास्पद असल्याच्या त्या म्हणाल्या. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात व राजवर्धन भाऊ थोरात यांनीही शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मेधा मैदानावर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. यावेळी संपूर्ण मेधा मैदान व इंजीनियरिंग कॉलेजचा परिसर हा विविध रंगांच्या पतंगांनी भरून गेला होता.

मा.मंत्री थोरात यांनीही घेतला पतंग उडवण्याचा आनंद
यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार असलेले लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या सहकार, समाजकारण,शिक्षण, कृषी,ग्रामीण विकास अशा सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देताना संगमनेर तालुका हे विकासाचे मॉडेल बनवले आहे. मेधा मधील पतंग महोत्सवात विद्यार्थ्यांच्या बरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. तर सौ.शरयूताई देशमुख,डॉ.जयश्रीताई थोरात व राजवर्धन थोरात यांनीही विविध विद्यार्थ्यांसमवेत पतंग उडवण्याचा आनंद घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe