Ahmednagar News : निवडणुकांसाठी के के रेंज ची भीती दाखवली जाते,पण…आ. लंके यांचा मोठा गौप्यस्फोट

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लष्करी सराव क्षेत्राच्या (के. के. रेंज) हद्दवाढीचा प्रश्न हा अनेक गावांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पारनेर सह अनेक गावांच्या मानगुटीवर ही टांगती तलवार आहे. बऱ्याचवेळा या गोष्टीचे राजकारणासाठी भांडवल केलेले सर्वानीच पहिले आहे. आता आ.निलेश लंके यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आ. लंके म्हणाले की, निवडणूक जवळ आल्या की, के के रेंज ची भीती दाखवली जाते. ही भीती दाखवून राजकीय पोळी भाजण्याचा डाव काही लोकांनी आखला आहे असा गौप्यस्फोट करत त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे विखे पिता-पुत्रांवर टीका केली आहे.

त्यासोबतच के. के. रेंजचे भूत भविष्यात पुन्हा कधीही ढवळपुरी परिसराच्या मानगुटीवर बसणार नाही असे आश्वासनही आमदार लके यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे ढवळपुरी परिसरात औद्योगिक वसाहतीसाठी दसऱ्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सर्वेक्षण देखील केले जाणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले. शुक्रवारी भाळवणी येथे ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील महिलांच्या मोहटादेवी दर्शन यात्रेच्या प्रारंभी ते बोलत होते.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केके रेंजचे राजकारण करणे मला तरी योग्य वाटत नाही. तुमचे राजकारण होते पण ढवळपुरीसारख्या आदिवासीबहुल भागात गरीब शेतकऱ्यांचा जीव धाकधूक होतो.

हा त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. केवळ राजकीय भाकरी भाजण्यासाठी गरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या भावना आणि भवितव्याशी खेळणे योग्य नाही. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. अशी खंत व्यक्त करतानाच आता आम्ही केके रेंजच्या भूताची कायमस्वरूपी व्यवस्था करणार आहोत. भविष्यात ढवळपुरी परिसरात हे भूत कधीच बसणार नाही, अशी ग्वाही आमदार लंके यांनी दिली.

निवडणुका तोंडावर आल्यानंतरच काही लोकांना देवदर्शन आणि दिवाळी फराळ आठवते. निलेश लंके मात्र त्यापैकी नाही. निवडणूक असो वा नसो, मतदारसंघातील माता-भगिनींना देवदर्शन घडविणे हे माझे कर्तव्य आहे,

या भावनेतून आम्ही देवदर्शन यात्रेचे आयोजन करीत आहोत असे महंत त्यांनी पुन्हा एकदा विखेंना टोला लगावला.यावेळी बंजारा समाजातील महिलांनी देवीची गाणी गात नृत्य सादर केले.

२५० महिलांनी पारंपरीक वेशातदेवीचे गाणी बोलीभाषेत सादर केले. हे नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले होते.यावेळी बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे, अशोक कटारिया, रोहोकले, सुदाम पवार, लाकुडझोडे, वकील सुवर्णा घाडगे, भागाजी संभाजी रोहोकले, प्रकाश राठोड आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe