Kopardi Rape Case : महाराष्ट्राला हादरावून टाकणाऱ्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रकरणातील आरोपीने तुरुंगातच आत्महत्या केली आहे. आरोपीने तुरुंगातच जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोपर्डीप्रकरणातील आरोपीला पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्याने आज सकाळी तुरुंगातच जीवन संपवलं. त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला.

आरोपी पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आपलं जीवन संपवलं. आज पहाटे गळफास घेऊन त्याने आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिला. सुमारे पाच वर्षांपासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता.

महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आज सकाळी पहाटेच्या सुमारास येरवडा कारागृहातील बराकमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन आरोपींना नगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २०१७ ला दोषी ठरविलं होतं.

काय झालं होत कोपर्डीत ?

13 जुलै 2016 च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती समोर येताच संपूर्ण देश हादरून गेला होता. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते.

अनेक ठिकाणी निदर्शन करण्यात आली होती. तर मेणबत्ती मार्चही काढण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात होती.

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची अहमदनगर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली होती. यावेळी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारच्यावतीने पीडितेची बाजू मांडली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe