Ahmednagar News : आतापर्यंत पुणे शहरात आपण कोयता गॅंग असल्याची चर्चा ऐकत होतो. मात्र आता नगर शहरात देखील कायता गॅंग असल्याचे समोर आले आहे. गहाण ठेवलेली मोटारसायकल परत सोडवण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले आहेत.
तर त्याचा बदल घेण्यासाठी जखमी झालेल्या तिघांनी परत कायनेटिक चौकात जाऊन कोयते हातात घेऊन टपऱ्यांची नासधूस केली तसेच या टोळीच्या मारहाणीत तिघे जखमी झाले आहेत. या गघटनेत एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश लोखंडे याने त्याची मोटारसायकल दहा हजार रुपयांना दादा पेटारे याच्याकडे गहाण ठेवली होती. ती सोडविण्यासाठी प्रकाश लोखंडे आणि चंद्रकांत अशोक सातपुते व अमोल खोमणे (तिघे रा. कोठला, नगर) हे तिघेजण गुरुवारी (दि. ११) दहा हजार रुपये घेऊन रेल्वेस्टेशनला पटारे याच्याकडे गेले. दरम्यान लोखंडे यांनी पेटारे याला दहा रुपये देऊन दुचाकीची मागणी केली.
तेव्हा पेटारे याने दुचाकी देण्यास नकार देत या तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी मारहाण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता १०९, ११८ (१) नुसार पाच जणांवर, तर कोयते हातात घेऊन दहशत केल्याप्रकरणी दोघांविरोधात आर्म ऍक्ट क्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
दादा पेटारे, मास्टर पेटारे, विजय गायकवाड, अक्षय तांदळे, सुरेश नन्नवरे (पूर्ण नावमाहिती नाही, सर्व रा. रेल्वेस्टेशन) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मात्र आपण आपली मोटारसायकल सोडवण्यासाठी गेलो असताना पैसे दिले तरीदेखील आपल्याला मोटारसायकल न देता उलट मारहाण केल्याने याचा
बदला घेण्यासाठी या तिघांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या तिघांनी रात्री कायनेटिकचौकात जाऊन कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करत तेथील टपऱ्या उलट्या करून नासधूस केली.
त्यामुळे चौकातील नागरिकांची पळापळ सुरू झाली. दरम्यान याबाबत पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत चंद्रकात सातपुते व प्रकाश लोखंडे अशा तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात पोलिसांनी ऍक्टनुसार गुन्हाही दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.