अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय, सोनई येथील विद्यार्थिनी वैष्णवी रतन हराळ हिने रांगोळीद्वारे गावचा नकाशा सादर केला.
या प्रतिकृतीत तिने गावचे चित्रण रेखाटले. या नकाशाद्वारे तिने गावातील मंदिरे, शेती, विहिरी, बस स्थानक, दवाखाना यांचे चित्रण रेखाटले. या भव्य नकाशाद्वारे तिने गावाची धार्मिक, सांस्कृतिक पद्धती जपण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी सरपंच संजय कोतकर, डॉ.गजानन भापकर, उद्योजक संदीप धावडे, रतन हराळ, संतोष भापकर, रमेश गिरवले, अशोक हराळ,
संजय भापकर आदींसह शेतकरी उपस्थित होते. या कलाकृतीसाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरी मोरे, प्रा.अनुप दरांदले, प्रा.सोमनाथ दरंदले,
प्रा जगताप मॅडम तसेच आदी विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, असे कृषिकन्या हराळ वैष्णवी हिने सांगितले. तिच्या या उपक्रमाचे पंचक्रोशितून अभिनंदन होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved