अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकाऱ्याला पाच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
रमेश श्रीहरी सुरुंग (वय 45) असे पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी
येथील तक्रारदार यांनी जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती योजने अंतर्गत पेव्हर ब्लॉक व्यवसाय सुरु करण्यासाठी २५ लाखांचे कर्ज प्रकरण सहा महिन्यापुर्वी महाराष्ट्र बँक (शाखा हंगेवाडी ता. श्रीगोंदा) येथे दाखल केले आहे.
सदर प्रकरण अद्याप प्रलंबित असुन, ते संबंधित बँक मॅनेजर कडुन लवकर मंजुर करुन घेऊन सदर प्रकरणाची सबसीडी लवकर मिळवून देणेकरिता जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी सुरुंग याने तक्रारदार यांचेकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.
याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत विभागाने सोमवारी लावलेल्या
लाच मागणी पडताळणीत सुरुंग याने तक्रारदार यांचेकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष केल्याचे निष्पन्न झाले. सुरुंग याने पाच हजारांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम