अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथे एकमेकांचे नातेवाईक असलेल्या दोन गटांत जमिनीच्या वादातून गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास तलवार, कुऱ्हाड, धारदार शस्त्रे, तसेच गजाने मारामारी झाली.
त्यात दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार आहेत.
चुलतभावांमध्ये अनेक वर्षांपासून जमिनीचे वाद आहेत. या कुरबुरीचे मोठ्या वादात रूपांतर होऊन एक गट तलवार, कुऱ्हाड, धारदार शस्त्र, तसेच गज घेऊन दुसऱ्या गटावर चालून गेला.
त्यात विक्रम निर्वाशा काळे व तुषार पांडुरंग भोसले गंभीर जखमी झाले. शोळा काळे हिलाही बेदम मारहाण करून तिच्या गळ्यातील अर्धा तोळा वजनाची मंचली ओरबडून लांबवण्यात आली.
स्थानिक रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास असमर्थता दर्शवल्याने दोघांनाही नगरला नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर अाहे.
या प्रकरणी अर्चना विक्रम काळे (३०) हिने दिलेल्या फिर्यादीवरून रमेश सावत्या भोसले, आत्मशा सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले, सावत्या अकल्या भोसले, कैलास निर्वाशा काळे, इनक्या खुट्या काळे,
मंगेश इनक्या काळे, सचिन पोपट काळे, अमोल पोपट काळे इतर २ अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न व अन्य आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved