संगमनेर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-शहरापेक्षा ग्रामीण विभागात कोरोनारुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. मागील ५ दिवसांत तालुक्यात १७५ बाधित आढळले. रुग्णसंख्या ५२४७ झाली.

यातील ३८०० बाधित ग्रामीण भागातील आहेत. शहराची बाधित संख्या १४४७ असून ग्रामीणची ३८०० आहे. ४७५३ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून २७९ जणांवर उपचार सुरु आहेत.

४३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. संगमनेर तालुक्यात एकूण १२५ शाळा असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९ वी ते १२ वीच्या फक्त १५ शाळा सध्या सुरु करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थीं संख्या ३१२०५ असून शिक्षक संख्या १८९१ आहे. मंगळवारी १३६७ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. ४१२७ पालकांचे संमती पत्र घेण्यात आले आहे.

१०९२ शिक्षकांची कोरोना चाचणी झाली असून ८ शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी बुधवारी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment