भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज सकाळ दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. लतादीदी यांच्या निधनामुळे राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे.
त्यानिमित्ताने उद्या 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. लतादीदी यांच्या निधनामुळे केंद्र सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/02/latamangeshkar1.jpg)
त्यामुळे पुढचे दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.
राज्य सरकारने यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “आज रविवार 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे.
या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( 1981 चा अधिनियम 26) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे”.