अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-नगरच्या मार्केटयार्ड मधील कांद्याच्या व्यापाऱ्यास दोघांनी तब्बल ४२ लाख ९९ हजार ७९६ रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत त्या व्यापाऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी नगर मधील एक व पुण्यातील एक अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या बाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सारसनगर येथील नितीन दत्तात्रय चिपाडे यांचे नगरच्या मार्केटयार्डमध्ये तसेच नेप्ती उपबाजारात आडत आहेत. तेथे ते स्वत:च्या शेतीतील तसेच इतर शेतकऱ्यांच्या कांदा मालाची खरेदी – विक्री करतात. मार्च २०१९ मध्ये दोघांनी चिपाडे यांच्याशी ओळख करुन त्यांच्याकडे कांदा खरेदी सुरू केली.
सुरुवातीला त्यांनी मालाचे पैसे दिले. त्यानंतर त्यांच्यात भरोशाचे संबंध निर्माण झाल्यामुळे प्रत्येक वेळी काही पैसे मागे ठेवण्यास सुरुवात केली. दि.१५ मार्च २०१९ ते ६ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत त्यांच्याकडे सुमारे ४२ लाख ९९ हजार ७९६ रुपये थकबाकी शिल्लक असून, या रकमेपोटी संबंधितांनी चिपाडे
यांना दि.२४ डिसेंबर २०१९ रोजी पुणे शहरातील एका बँकेचे तीन चेक दिले होते. सदरचे तीनही चेक न वटता परत आले. त्यानंतर त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला मात्र त्यांनी पैसे न देता फसवणूक केल्याची फिर्याद नितीन चिपाडे
यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved