कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; चोऱ्यांचे सत्र सुरूच

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होऊनही चोरटे पकडले जात नसल्याने आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.

पारनेर टॅंलुक्यातील भाळवणी बस थांब्याजवळच्या नेहमी गजबजलेल्या ठिकाणावरून शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बजाज सिटी 100 ही मोटारसायकल अज्ञात चोरटयांनी चोरून नेली.

रविंद्र दत्तात्रेय जगदाळे (वय २४ रा. जामगांव) हा तरूण शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भाळवणी येथील बस थांब्याजवळच्या विशाल केश कर्तनालयासमोर त्याची दुचाकी (क्र. एम एच १७ एक्स ३०३५) उभी करुन कामा निमित्त तेथेच आजूबाजूस गेला होता.

तिच संधी साधून अज्ञात चोरटयांनी मोटारसायकल चोरून नेली. तरूण पुन्हा तेथे आला असता मोटारसायकल आढळून आली नाही. त्याने पारनेर येथे येउन अज्ञात चोरटयांविरोधात फिर्याद दाखल केली.

पारनेर पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक घनश्याम पळब यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. जी एस पंदरकर हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment