या तालुक्यात परत बिबट्याचा हल्ला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील बिबट्याचे हल्ला करण्याचे सत्र थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील मिडसांगवी गावात बुधवारी विद्युतपंप सुरु करण्यास गेलेल्या एका सोळा वर्षाच्या मुलीवर बिबट्याने सकाळी सात वाजता हल्ला केला.

मफलर व ओढणी असल्याने बिबट्याच्या तोंडात कापड गेल्याने मुलीचे नातेवाईक धावल्याने मुलगी वाचली. तानीया दिलावर शेख असे जखमी मुलीचे नाव आहे.

दुस-या घटनेत बुधवारी तांबेवाडी (टाकळीमानुर) येथील शेतात दारे धरणाऱ्या गणेश सुदाम महानवर (वय-१६ वर्षे) यांच्याकडे बिबट्या येत असताना त्याने विहरीत उडी टाकली.

आरडाओरड केल्यानंतर शेजारचे लोक मदतीला धावले. सकाळी अकरा वाजता ही घटना घडली.  बुधवारी सकाळी सात वाजता तानीया शेख (मिडसांगवी) ही शेतातील विहरीवरील विजपंप सुरु करायला गेली.

विहरीवर बसलेल्या तानीयावर बिबट्याने हल्ला केला. यात तानीयाच्या हातावर जखमा झाल्या आहेत. खरवंडी येथे खाजगी दवाखान्यात तिच्यावर उपचार करण्यात आले.

तर तांबेवाडी शिवारातील शेतात दारे धरणाऱ्या गणेश सुदाम महानवर याच्याकडे बिबट्या येत असल्याचे पाहून त्याने विहरीत उडी टाकली.

आरडाओरड केल्यानंतर शेजारचे लोक मदतीला धावले. दोन दिवसा पूर्वीच पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील शंकर धोंडीबा शिरसाट यांच्या घरासमोर संध्याकाळी बांधलेल्या म्हशीवर बिबट्याने हल्ला केल्याने

ती म्हैस जागीच ठार  झाली. कुटुंबातील व्यक्तींनी आरडाओरडा केल्याने त्याने तेथून बिबट्याने पळ काढला . सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले.

 अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News