अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-अकोले तालुक्यात शिकारीच्या मागे लागलेल्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शिकारही गेली व जीवही त्याला गमवावा लागला.
अकोले तालुक्यातील आंबड भागातील मुक्ताईवाडी येथे ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, गौराम वाळीबा जाधव हे आपल्या विहिरीवर विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना हा बिबट्या विहिरीच्या पाण्यावर मृत अवस्थेत तरंगताना आढळून आला.
त्यांनी सरपंच दत्तू जाधव यांना माहिती दिली. त्यानंतर वनपाल व्ही.एन. पारधी यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृत बिबट्यास विहिरीबाहेर काढण्यात आला.
सदरील बिबट्या हा मादी बिबट्या होती ती 2 ते अडीच वर्षांची होती. शिकारीच्या मागे लागताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज वनरक्षक ज्ञानेश्वर कोरडे यांनी व्यक्त केला.
वन विभागाच्या सुगाव येथील नर्सरीत या बिबट्याचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. भांगरे यांनी शवविच्छेदन केले. या नंतर शासकीय नियमानुसार या बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved