कोरोनाची महामारी लवकर जाऊ द्या; भगवान दत्तात्रयांना साकडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-करोनाची महामारी लवकरात लवकर जाऊ द्या, सारे विश्व सुखी होऊ द्या, असे साकडे श्री क्षेत्र देवगाव येथील भगवान दत्तात्रयांना भास्करगिरी महाराज यांनी घातले.

करोनासंकट असल्याने श्री क्षेत्र देवगड मंदिर प्रांगणात भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

मंगळवारी सायंकाळी 6 वाजता श्री दत्त मंदिरात छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी पहाटे भास्करगिरी बाबांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात येऊन अभिषेक घालण्यात आला.

भास्करगिरी बाबांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात येऊन आरती करण्यात आली. भास्करगिरी महाराज म्हणाले की यावर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय झाला.

देवगडला न येता घरीच दत्त उपासना करावी या केलेल्या विनंतीचे पालन केल्याबद्दल त्यांनी भक्तांचे आभार मानले. तसेच यात्रा रद्द चा निर्णय याआधीच झाल्याने पहाटेपासून देवगडकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले होते.

त्यामुळे प्रवरासंगम, देवगडफाटा, नेवासा येथून देवगडकडे जाणारे रस्ते ओस पडलेले दिसत होते. नेवाशाचे प्रभारी पोलीस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment