जरे यांना न्याय मिळण्यासाठी लढा उभारु – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या व यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहू. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

सामाजिक कार्यकर्त्या जरे यांच्या हत्या करणाऱ्या सूत्रधारास अटक करावी यासाठी विविध संघटनांनी कॅन्डल मार्च काढला होता. त्याच्या समारोप प्रसंगी आ. जगताप बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जरे हत्याकांडाच्या तपासाला गती मिळावी,

मुख्य सूत्रधाराला अटक लवकरात लवकर झाली पाहीजे. समाजातील अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर बसायला हवा. जरे यांचा अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग असायचा त्यांना न्याय मिळेपर्यंत आपण लढत राहू.

असेही ते म्हणाले. या कॅन्डल मार्च वेळी गिरीश कुलकर्णी , दीपक खेडकर, हरिभाऊ डोळस राष्ट्रवादीचे प्रवक्ते आदीसह फिरोज खान, गायकवाड मंगल भुजबळ आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment