लॉकडाऊनमुळे साई संस्थानला ‘इतक्या’ कोटींचा फटका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे.

या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम साई दरबारी जमा होणाऱ्या देणगीवरही झाला आहे. सुमारे 182 कोटी 61 लाख 17 हजार 644 रुपये इतकी देणगीची घट झाली आहे.

17 मार्च 2020 पासून श्रीसाईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. 17 मार्च ते दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत साईभक्तांकडून विविध प्रकारे 20 कोटी 76 लाख 54 हजार 151 रुपये देणगी

संस्थानला प्राप्त झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 203 कोटी 37 लाख 71 हजार 795 रुपये इतकी देणगी संस्थानला प्राप्त झाली होती.

मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 182 कोटी 61 लाख 17 हजार 644 रुपये इतकी देणगीची घट झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.

मागील वर्षी दिनांक 17 मार्च 2019 ते 31 ऑगस्ट 2019 याकालावधीत दक्षिणापेटीव्दारे साईभक्तांकडून 75 कोटी 29 लाख 78 हजार 927 रुपये इतकी देणगी संस्थानला प्राप्त झाली होती.

मात्र यावर्षी करोना व्हायरसच्या संकटामुळे मंदिर बंद असल्या कारणाने दिनांक 17 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 कालावधीमध्ये दक्षिणापेटीव्दारे साईभक्तांकडून कोणतीही देणगी प्राप्त झाली नाही.

17 मार्च ते 31 ऑगस्ट 2020 याकालावधीत किती जमा झाली रक्कम? –

  • – ऑनलाईनव्दारे 11 कोटी 47 लाख 99 हजार 794 रुपये
  • – रोख देणगी 18,32,397/- रुपये,
  • – चेक/डी.डी. 93,05,411.69/- रुपये,
  • – मनीऑर्डर 66,21,056/- रुपये,
  • – परकीय चलन 15,35,963.31/- रुपये,
  • – डेबिट/क्रेडीट कार्ड 2,36,991/- रुपये
  • – इतर मार्गाने 7,33,22,538.88/- रुपये
  • – एकूण – 20 कोटी 76 लाख 54 हजार 151 रुपये

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment