लोकनेते : आमदार निलेश लंके

Ahmednagarlive24
Published:

पारनेर – नगर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार लोकनेते निलेश लंके यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धा उमेदवाराचा तब्बल ६२ हजार मतांनी पराभव केला. एका प्राथमिक शिक्षकाच्या सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंके यांनी सर्वच आमदार पुत्रांची एक फळीच गारद केली आहे. प्रस्तापित पुढाऱ्यांना डावलून पारनेर – नगर तालुक्यातील जनता देखील लंके यांच्या पाठीशी ठाम उभी राहीली.

२००७ मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणूकीत त्यांचा निसटता पराभव झाला, परंतु खचून न जाता सुपा गटात लोकसंपर्क वाढवला व २०१२ च्या पंचायत समिती निवडणूकीत ते विजयी झाले. त्यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके या अडीच वर्षे पारनेर पं.सच्या उपसभापती झाल्या. २४ तास ३६५ दिवस जनतेत काम करणारा मोबाईल नेता अशी त्यांची प्रतिमा तयार होऊ लागली. त्यानंतर २०१७ मध्ये राणीताई लंके सुपा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्या. सध्या त्या जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या आहेत.

आ.लंके यांना कुटुंबातून कोणताही राजकीय वारसा नाही. त्यांचे वडील ज्ञानदेव लंके सेवानिवृत्त प्रा.शिक्षक असून आई गृहीणी आहे. त्यांना लहानपणापासूनच समाजकारणाची आवड असल्याने त्यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून प्रेरणा घेत ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत जनसेवेचे व्रत हाती घेतले. शालेय वयात हंगेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून तरुण वर्गाची फळी तयार केले. बालपणापासून त्यांना तन – मन – धनाने साथ देणारे त्यांचे जिगरी दोस्त आजही त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील हंगेश्वर पॅनलने आजपर्यंत हंगा ग्रामपंचयतीवर एकहाती वर्चस्व ठेवले आहे.

जनतेत मिसळून काम करण्याची त्यांची पद्धत, रात्री अपरात्री जनतेच्या सेवेसाठी धावून जाण्याची सवय, यामुळे ते जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. परंतु ज्या शिवसेना पक्षाचे ते तालुकाप्रमुख होते त्या पक्षाच्या नेतृत्वाने या प्रामाणिक नेत्यावर अविश्वास दाखवला व त्यांना २७ फेब्रुवारी २०१८ रोजी शिवसेनेतून काढून टाकले. या सर्व घडामोडींनंतर त्यांच्याकडे कोणतेच पद नव्हते. फक्त जीवाभावाचे मित्र सोबतीला होते.

सुपा एमआयडीसीतील भूमिपुत्रांना न्याय, गरीबांना शस्त्रक्रिया व उपचारासाठी मदत निधी, शिक्षणासाठी मदत,अपघातग्रस्तांना मदत, रक्तदान शिबीरे, शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप, गरीबांना घरकुले मिळवून दिले. तहसीलकार्यालयासमोर उपोषण करून वृध्दांना संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजनांचा लाभ मिळवून दिला. बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा घेऊन युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. पारनेर व नगर तालुक्यातील महिलांना नवरात्रीमध्ये मोफत मोहटादेवी दर्शन मोहीम राबवली, शेतकऱ्यांसाठी पारनेर येथे कृषी प्रदर्शन भरविले. दूध व कांदा भाव वाढीसाठी सुपा येथे महामार्गावर आंदोलने केली.

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून दोनही तालुक्यातील सर्व गावांचे दौरे करून लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे अजितदादांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतले व उमेदवारी दिली. शेतकऱ्यांचे नेते शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली व जिंकली. सध्या ते मतदार संघातील जनतेचा पाणी, रस्ते व विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दि.२४ मे २०२० रोजी पारनेर येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन लंके यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.

त्यामध्ये १०१ विवाह लावण्याचा मानस आहे, तसेच विधान सभा सदस्य म्हणून मिळणाऱ्या वेतनातून दर महिन्याला एका अपंगाला मोपेड गाडी घेऊन देण्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे.अशा या लोकनेत्याचा वाढदिवस दि.१० मार्च २०२० रोजी हंगा येथे साजरा होत आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आपल्या हातून अशीच जनतेची सेवा घडो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment