चाकूचा धाक दाखवून पाच लाख लुटले; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे, पोलीस प्रशासनाचा धाक न राहिल्याने चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच अशीच एक लुटमारीची घटना कोपरगाव मध्ये घडली आहे.

चाकूचा धाक दाखवून एकास पाच लाखाला लुटल्याची घटना कोपरगाव शहरात घडली. या लूट प्रकरणी दिलीप शंकर गौड (वय ३५ वर्षं, धंदा-व्यापार, रा. निवारा) कोपरगाव यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी कि, दिलीप गौड हे व्यापारी रात्री साडेदहाच्या सुमारास ४ लाख ९८ हजार ९०० रुपयांची रोकड घेऊन मोटर सायकलवरून जात असताना

भाई-भाई मोटर गॅरेज या ठिकाणी दोन शाईन व पल्सरवरून आलेल्या चौघांनी त्याच्या दुचाकीला आपल्या दुचाकी आडव्या मारून त्याला थांबविले.

दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी चाकूचा धाक दाखवून गौड यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, टॅब व कागदपत्रे असलेली बॅग लुबाडली. यानंतर ते चौघेही पसार झाले.

या प्रकारानंतर दिलीप गौड यांनी कोपरगाव शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment