भामट्यांकडून बायपासवर लूटमार सुरुच; एकाच दिवसात तीन घटना घडल्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- शहरात गुन्हेगारी वाढू लागली आहे, दरदिवशी लुटमारीच्या घटना घडत असून यामुळे नागरिकांसह वाहनधारकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच निंबाळक बायपास रोड परिसरात एकाच दिवशी दोन ट्रक चालक व व कार चालकाला दमदाटी करून रोख रक्कम व मोबाईल लुटल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, निखील मधुकर राठोड (रा. औंढा नागनाथ जि. हिंगोली) हा युवक मित्रासमवेत निंबळक बायपास मार्गे पुणे येथे जात होता.

यावेळी मोटारसायकलवरून चार लुटारू आले. त्यांनी कारमधील दोघांना दमदाटी करून त्यांच्याकडील कार व मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी निखील याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना असीम पीर बाबालाल मुल्ला (रा. बारामती) हे ट्रक घेऊन जात असताना निंबळक ते केडगाव मार्गे जात असताना ट्रकच्या काचा फोडून दमदाटी करत साडे चार हजार रुपये लुटून नेण्यात आले.

तसेच रवींद्र मारुती खराडे यांचाही ट्रक अडवून त्यांच्याकडील ३ हजार रुपये हिसकावून नेण्यात आले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment