Ahmednagar News : ‘ती’ अल्पवयीन असताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या काही तरुणांनी तिच्याशी सलगी निर्माण केली. तब्बल पाच वर्ष तिच्या संपर्कात राहून तिला वेळोवेळी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
फसवून गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण केले. लग्न करण्यासाठी तिला कारमधून विविध शहरांसह मुंबईला नेले सानपाडा येथे एका हॉटेलसह लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला.
अश्लील फोटो व्हायरल करण्यासह तिच्यासह कुटुंबीयांना संपवून टाकण्याची धमकी दिली. बांद्रा येथे बळजबरीने तिच्याशी लग्न आणि धर्मांतर करुन अत्याचार केल्याचे खळबळजनक व संतप्त वास्तव अत्याचारपीडित तरुणीने पोलिसांना सांगितले.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागात घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील म्होरक्यासह चौघांवर घारगाव पोलिसांनी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करत मुख्य सुत्रधारास गजाआड केले आहे.
तब्बल पाच वर्षांपासून पीडित तरुणीला प्रेमाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि त्यानंतर फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी नेत बळज बळजबरीने लग्न आणि धर्मांतर करुन अत्याचार केल्याचे जबाबातून समोर आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही मुख्य आरोपी शादाब तांबोळी याने सन २०२० पासून यूसुफ चौघुले, कुणाल शिरोळे यांच्या मदतीने वेळोवेळी पाठलाग करुन प्रेमाचे आमिष दाखवत सलगी केली.
याचा फायदा उठवून तांबोळी व चौघुले या दोघांनी पीडित तरुणीला फसवून मंचर (पुणे) येथे बोलावले.
त्यानंतर चौघुले याच्या कारमधून (क्र. एमएच. १७, बीएक्स. ००९७) मंचरवरुन लग्नासाठी चाकण येथे नेले. यासाठी तिला पाण्यातून काहीतरी गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले.
तेथून मुंबईला पुन्हा दुसऱ्या वाहनाने पाठवून दिले. मुंबईत आल्यावर येथील अयाज पठाण याने सतत धमकावून तांबोळी आणि डित तरुणीला लॉजवर पाठवून दिले. तेथे तांबोळी हा तिला फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या घरच्यांना संपवून टाकेल अशी धमकी देऊन अत्याचार केले.
विशेष म्हणजे तिला न सांगता बळजबरीने पीडित लग्नाच्या व धर्मांतराच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्याचे पीडितेने जबाबात सांगितले.
यावरुन पोलिसांनी मुख्य आरोपी शादाब तांबोळी, सूत्रधार यूसुफ चौघुले, कुणाल शिरोळे व अयाज पठाण यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहे.
दरम्यान, यातील म्होरक्या यूसुफ चौघुले याचा पोलीस कसून शोध घेत होते. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने श्रीरामपूर येथून त्याला अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र अद्याप तिघे पसार आहेत.