सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांनी एकत्र केला विमान प्रवास ! फोटो शेअर करत म्हणाले…

Maharashtra politics news :- विखे पाटील आणि पवार या दोन कुटुंबीयांमधलं राजकीय वैर महाराष्ट्राला ठाऊक आहे. दोन्ही कुटुंबातले वाद, जुन्या पिढीत एकमेकांशी असलेलं राजकीय वैर त्याचे काही दिवसांपूर्वी उमटलेले राजकीय पडदास या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिल्या आहेत.

मात्र अशात चर्चेचा विषय ठरतो आहे तो सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांनी एकत्र केलेला विमान प्रवास आणि त्यानंतर सुजय विखेंनी शेअर केलेला फोटो.

अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे खासदार सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची शनिवारी औरंगाबाद विमानतळावर भेट झाली.

त्यानंतर या दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला. औरंगाबाद ते मुंबई हे दोघे सोबत आहे. त्याच विमान प्रवासाचा फोटो सुजय विखे पाटील यांनी शेअर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पक्षाच्या कार्यक्रमासाठी औरंगाबादला आले होते.

तर ज्येष्ठ नेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय हेही औरंगाबादला गेलेले होते.

तेथून दोघेही विमानाने मुंबईला गेले. विमानात शेजारी बसून त्यांनी प्रवास केला. यावेळी दोघांत नेमकी काय चर्चा झाली, हे त्या दोघांनाच ठावूक. प्रवासात आणि प्रवास संपल्यानंतर दोघांनी एकत्र छायाचित्र काढले.

हे छायाचित्र डॉ. विखे यांनी सोशल मीडियात शेअर करून सीमांपलीकडील मैत्री असल्याचे म्हटले.यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. काहींनी याचा राजकीय अर्थ काढून दोघांनाही पक्ष बदलणार काय? अशी विचारणा केली.

काहींनी या मैत्रीचे कौतूक केले. अनेकांनी मात्र कडाडून टीका केली आहे. गरीब वडिलांची मुले अशा उपरोधिक प्रतिक्रियाही आल्या असून सगळे राजकारणी आतून एक असून शेतकरी आणि जनतेची फसवणूक सुरू असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.

प्रवासानंतर सुजय विखे पाटील पाटील यांनी पार्थ पवार यांच्यासोबतचा फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केला. ‘मैत्रीला सीमांचं बंधन नसतं’, असं म्हणत त्यांनी तो फोटो पोस्ट केला.

या फोटोवर हजारो जणांनी लाईक्सचा वर्षाव केला तर कमेंट्समधून आपली मतं मांडली. काही कमेंट्स या दोघांची मैत्री अधोरेकित करणाऱ्या होत्या, तर काही कमेंट दोघांच्याही फिरकी घेणाऱ्या होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe