महाविकास आघाडीत बिघाडी! अहिल्यानगर शहर विधानसभेचे जागा विकली? शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी

जागा वाटपामध्ये महाविकास आघाडी कडून अहिल्या नगर शहराची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिल्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र प्रचंड प्रमाणात नाराज झाले असून त्यांनी अहिल्यानगर शहर विधानसभेची जागा विकल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.

Published on -

Ahilyanagar News:- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असो किंवा महायुती मधील घटक पक्ष यांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वाद होताना दिसून येत असून काही ठिकाणी बंडखोरी होण्याची देखील शक्यता आहे.

जवळपास आता महायुती व महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून जागा वाटप पूर्ण करण्यात आलेले आहे. परंतु तरी देखील काही जागांवर वाद अजून देखील दिसून येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर जर आपण अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे सध्या दिसून येत आहे.

जागा वाटपामध्ये महाविकास आघाडी कडून अहिल्या नगर शहराची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिल्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र प्रचंड प्रमाणात नाराज झाले असून त्यांनी अहिल्यानगर शहर विधानसभेची जागा विकल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.

इतक्याच नाही तर आपल्या पदांचा राजीनामा देण्याची तयारी देखील पदाधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे हा वाद आता कसा मिटवला जातो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

 अहिल्यानगर शहर विधानसभेची जागा विकल्याचा आरोप

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जागा वाटपामध्ये अहिल्यानगर शहर विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे गेली व या पक्षाच्या माध्यमातून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

परंतु अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असताना देखील ही जागा राष्ट्रवादीला दिल्यामुळे मात्र शिवसैनिकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी दिसून येत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहर विधानसभेची जागा विकल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला व खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मात्र जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी देखील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दर्शवली आहे.

या संदर्भात आज शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मंगळवारी म्हणजे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व माजी महापौर भगवान फुलसौंदर अर्ज भरणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe