‘त्या’ सरकारचे पाप उघड करण्याचे काम महायुती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय हा महाराष्ट्राचा धोरणात्मक निर्णय म्हणून जाहीर करणाऱ्या काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कर्जत भाजपाच्या वतीने जाहीर निषेध करत तालुकाध्यक्ष चंद्रशेखर खरमरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करत निवासी नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

मविआ सरकारने त्यांच्या काळात फैसिलिटी मॅनेजर म्हणून नऊ कंपन्यांची नियुक्ती केली होती, महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर हा निर्णय मंत्रिमंडळात चर्चिला गेला,

त्यामध्ये सदरहू कंपन्यांचे दर २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहेत, असे लक्षात आल्यानंतर ते कमी करण्याबाबत महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेतलीं परंतु काँग्रेस उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मविआ सरकारने हा निर्णय सरकारचा धोरणात्मक निर्णय असून,

तो महायुती सरकारने घेतल्याचा कांगावा सुरू करून युवकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्या मविआ सरकारच्या भष्ट कारभाराचा भांडाफोड करून हा कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द करून तत्कालीन मविआ सरकारचे पाप उघड करण्याचे काम महायुती सरकारने व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

कर्जत येथे भाजपा कार्यकत्यांनी राज्याचे सामाजिक जीवन कलषित करणाऱ्या उबाठा, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध केला. भाजपाचे कर्जत तालुकाध्यक्ष चंद्रशेखर खरमरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या वेळी अशोक खेडकर गणेश क्षीरसागर, सुनिल काळे, अनिल गदादे, विनोद दळवी, आरतीताई थोरात, निताताई कचरे, राहुल निबोरे, डॉ. संदिप बोराटे, उमेश जपे, रवि कानडे, अक्षय क्षिरसागर, तात्यासाहेब खेडकर, सौरभ पाटील, नंदलाल काळदाते,

गणेश काळदाते, बंटी यादव, स्वप्निल तोरडमल, कृष्णा क्षीरसागर, सागर साळुंके, काका पिसाळ, अमोल भगत, सुजित घोरपडे, हानु गावडे, बबन लाढाणे, रुद्रा भिसे, पप्पू सुरवे, शेखर डाडर, विभिषण सुळ, आदी उपस्थित होते. निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांनी निवेदन स्वीकारले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe