Ahilyanagar News: राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून एका मागून एक निर्णय घेण्यात येत असून अनेक ठिकाणी विविध कामांचे भूमिपूजन देखील केले जात आहे.
दुसरे म्हणजे राज्यातील महायुती सरकार आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून राजकीय वातावरण या सगळ्या मुळे तापायला सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने बघितले तर काँग्रेस पक्षाच्या संकल्प मेळाव्याच्या आयोजन श्रीरामपूर येथील लक्ष्मी त्रंबक मंगल कार्यालयामध्ये आमदार लहू कानडे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते
व यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महायुती सरकारवर आरोप केला की, राज्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महायुती सरकारने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट सोशल मीडियासाठी दिल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच बोलताना त्यांनी म्हटले की,महाविकास आघाडी सरकार जर सत्तेवर आले तर लाडकी बहीण योजनेपेक्षा चांगली योजना अमलात आणणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी या निमित्ताने दिली. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला धक्का लावण्याचा जो काही विरोधकांचा आरोप आहे तो खोटा असल्याचे देखील आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
महायुतीने सोशल मीडियावर केला एक हजार कोटीचा खर्च– आमदार बाळासाहेब थोरात
राज्यात विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महायुती सरकारने एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट सोशल मीडियासाठी दिल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले, तर लाडकी बहीणपेक्षा चांगली योजना अंमलात आणणार आहोत.
त्यामुळे योजनेला धक्का लावण्याचा विरोधकांचा आरोप खोटा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेस पक्षाच्या संकल्प मेळाव्याचे आयोजन येथील लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालयात आमदार लहू कानडे यांच्या वतीने करण्यात आले होते. यानंतर पत्रकारांशी थोरात यांनी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,
तालुकाध्यक्ष अरुण नाईक, माजी उपनगराध्यक्ष अंजूम शेख, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, महंमद शेख, सलीम शेख, प्रकाश ढोकणे, समीन बागवान, अशोक कानडे, अमृत धुमाळ आदी उपस्थित होते.थोरात म्हणाले, महायुती सरकारवर स्थापनेपासून खोके सरकारचा आरोप झाला. एका खोक्यामध्ये किती पैसे असतात, हे जनतेला माहिती झाले आहे.
७० हजार कोटी रुपये भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांना त्यांनी सोबत घेतले. पक्षांतरबंदी कायदा मोडीत काढला.या सरकारला बहीण लाडकी नसून, केवळ सत्ता लाडकी आहे. भापजला या देशामध्ये चातुर्वण्य व्यवस्था आणावयाची आहे. त्यांना येथे मनुवाद प्रस्थापित करायचा आहे.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचा छळ करणारी ही विचारधारा आहे. साहित्यिक उत्तम कांबळे यांनी महाराष्ट्रात हरियाणा होणार नाही, असे स्पष्ट केले. दोन्ही राज्यांमध्ये मोठे भौगोलिक अंतर आहे, तसेच महाराष्ट्र हा फुले, शाहू व आंबेडकर यांना मानतो.
राजकारण स्वच्छ, सुंदर व नैतिक होण्यासाठी लहू कानडे यांच्यासारख्या राजकारण्यांची गरज आहे.डॉ. सुधीर तांबे यांनी कानडे यांच्या उमेदवारीबाबत काळजी करू नये. पक्षालादेखील चांगल्या माणसांची गरज आहे, असेही कांबळे म्हणाले.