अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-जामखेड तालुक्यातील मोहा गावच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारीका शिवाजी डोंगरे तर उपसरपंचपदी स्वाती वामन डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मागील अडीच वर्षांपासून सरपंच म्हणून सारीका डोंगरे कारभार पाहत आहे. सरपंच सासू तर उपसरपंच सुन आहे. तसेच या ग्रामपंचायत मध्ये भिमराव कापसे व उजाबाई कापसे हे पतीपत्नी सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
मोहा ग्रामपंचायतमध्ये प्रथमच महिला राज आले आहे. मोहा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए.डी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
सरपंचपद नागरिकांचा मागासप्रवर्ग व्यक्तीसाठी पद राखीव होते. सकाळी अकराच्या सुमारास सरपंच सारीका डोंगरे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला तर उपसरपंचपदी स्वाती वामन डोंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणूक कालावधीत सरपंच व उपसरपंच या पदासाठी या दोघींचेच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
सरपंचपदी सारिका डोंगरे व उपसरपंचपदी स्वाती डोंगरे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच गावात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2021, all rights reserved