चक्क! या गावात गायले जाते “कोरोना मुक्तीचे पसायदान”

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-  जगावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे, संशोधक लस शोधण्याचे काम करत आहे. मात्र अद्यापही यश आले नसल्याने हे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

यातच नगर जिल्ह्यातील नेवासा म्हणजेच श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नेवासामध्ये कोरोना मुक्तीचे पसायदान मागतील जात आहे.

कोरोना मुक्तीचे पसायदान मागितले जात आहे..जगावर-देशावर आलेले हे कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे यासाठी मंदिर, मस्जिद,चर्च,गुरुव्दारा यामधून प्रार्थना केली जात आहे.

त्यात नेवासा तालुका ही मागे नाही. नेवासातील नारायण महाराज ससे यांनी माऊलींच्या पसायदानावर आधारित कोरोना मुक्तीचे पसायदान मागितलेले आहे.

सध्या हे कोरोना मुक्ती पसायदान तालुक्यातील अनेक मंदिरांबाहेर हे कोरोना पसायदान फलक दिसून येत आहे. हे पसायदान लिहिण्यामागे लोकांची जनजागृती करण्याचा हेतू मात्र माऊली प्रमाणेच उदात्त आहे.

कोरोना मुक्तीसाठी लिहिलेले पसायदान असे…

कोरोना पसायदान

  • आता सर्वात्मके जीवे l विनाकारण न फिरावे ll
  • घरीच बैसूनी रहावे l निवांतपणे ll1ll
  • एकमेका कर न मिळवावे l दुरुनीच नमस्कारावे ll
  • अंतर सुरक्षित राखावे l परस्परामाजी ll2ll
  • सर्वसर्वदा हात धुवावे l रूमालविना न शिंकावे ll
  • कोमट जल प्राशावे l थंड वर्जावे सर्वथा ll3ll
  • घरी येता जरी कंटाळा l मदत करावी गृहिणीला ll
  • पुण्य लगे जीवाला l पतीव्रतेचे ll4ll
  • करा स्वच्छता सदनाची l त्याच बरोबर तनाची ll
  • काढा जळमटे मानाची l शुचिर्भूत व्हावया ll5ll
  • करा मनन आणि चिंतन l थोडा वेळ नामस्मरण ll
  • चुकविता येईल मरण l स्वतःसहित इतरांचे ll6ll
  • आज पावे तो खूप पळाला l आता विश्रांती शरीराला ll
  • सादर व्हावे समयाला l संत वचन हे असे ll7ll
  • आहे विषाणूचे संकट l करा मनाला बळकट ll
  • ध्यान योगाचा वज्रटत l उभारावा भोवताली ll8ll
  • समय नव्हता म्हणोन l केले नसेल वाचन ll
  • ज्ञानेश्वरी ग्रंथ पावन l आता तरी वाचावा ll9ll
  • आयुष्याला पुरेल l पुरोनिया उरेल ll
  • ग्रंथाची ऐसी रेलचेल l आहे संत कृपे ll10ll
  • अवाहन करिती वारंवार l दिल्ली आणि मुंबईकर ll
  • धोका वाढेल फार l बेफिकीर रहाता ll11ll
  • शासन,पोलीस,डॉक्टर l स्वच्छतेचे हे शुरवीर ll
  • सेवा देतो अहोरात्र l स्मरण त्याचे असावे ll12ll
  • हे ही जातील दुःखदिन l येतील पुढे सुखाचे क्षण ll
  • तोवर संयमाचे पालन l मनापासोन करावे ll13ll
  • येथे म्हने श्री निसर्ग रावो l कोरोना ना पसरावो ll
  • हाच हेतु मनी ध्यावो l जन कल्याण

हेतुने ल्ल१४ल संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदान संदर्भ घेत शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आव्हान या पसायदानातून करण्यात आले आहे. असे मत नारायण महाराज ससे यांनी व्यक्त केले

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment