कर्जत पोलिसांची मोठी कारवाई: १६ बाऊन्सर ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-कर्जत तालुक्यातील ५४  ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे कामकाज अत्यंत शांंततेपार पडले. मात्र मतदानाच्या दिवशी रात्री मात्र पाटेगाव ग्राम पंचायतच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हाणामारीने या शांततेला गालबोट लागले.

दरम्यान कर्जत पोलिसांनी वेळीच धाव घेत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. कर्जत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक सुरू असताना दि.१५जाने रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना,

सपोनी सुरेश माने यांना माहिती मिळाली की, स्थापलिंग पॅनलचे प्रमुख शहाजी देवकर यांच्या घरासमोर वागणे याठिकाणी घरी पैलवान आले आहेत.

याबाबत माने यांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी (एमएच १४, ५७५५) या क्रमांकाच्या एका ट्रॅव्हल्स मध्ये १६ लोक मिळून आले.

याप्रकरणी पाटेगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाव टाकण्याच्या अनुषंगाने पुणे येथील सोळा बाउन्सर शहाजी देवकर यांच्या घरी ठेवल्याने त्यांच्या विरुद्ध पोकॉ.अमित बर्डे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.