कृषी विकासात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे मोठे योगदान – महसूलमंत्री

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. सहकारासह विविध क्षेत्राच्या विकासासाठी अर्थपुरवठा करण्याचे काम जिल्हा बँक करते.

शिस्त व काटकसर हे बँकेचे वैशिष्ट्य असून कृषी क्षेत्रासह जिल्ह्याच्या विकासात अहमदनगर जिल्हा बँकेचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर येथे नगरपालिकेसमोर जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सीताराम पा. गायकर होते तर व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, बँकेचे उपाध्यक्ष रामदास पाटील वाघ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे होते.

याप्रसंगी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि जिल्हा बँकेचे अतूट नाते होते. सुमारे 45 वर्षे बँकेचे संचालक व पंधरा वर्षे अध्यक्ष राहिलेल्या सहकारमहर्षी आदरणीय भाऊसाहेबांनी अत्यंत काटकसर व पारदर्शकतेतून बँक राज्यात नावारूपास आणली.

आज तीच परंपरा बँकेने कायम ठेवली असून ही बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू ठरली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काची बँक अशी ओळख निर्माण झाली असून बँकेने एक लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवले आहे.

शासनाने दिलेल्या कर्जमाफीचा बँकेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. संगमनेर, अकोले तालुका दरवर्षी जवळजवळ शंभर टक्के कर्ज वसुली देत असून एक चांगली परंपरा तालुक्यात आहे गोरगरिबांच्या व सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून होत असून,

बँक हीच परंपरा पुढे कायम ठेवेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. बँकेचे उपाध्यक्ष रामदास पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment