अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- सध्याचे कोरोना आजाराचे संकट व त्यामुळे करण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय अश्या परिस्थितीमध्ये विवाह सोहळा पार पाडण्यासाठी शासनाने तूर्त पन्नास व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा संपन्न करण्यात यावा असे आदेश जारी केले आहेत.
सध्याचे तात्पुरत्या काळासाठी केलेला हा कायदा कायमस्वरूपी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते दवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवलेल्या निवेदनात दाहतोंडे यांनी म्हटले आहे की,
सध्याचे संकट काळाची गरज म्हणून हा कायदा करण्यात आला आहे आणि लोकही या कायद्याच्या अंमलबजवणी करत आहेत. केवळ पन्नास किंवा त्यापेक्षा ही कमी लोकांमध्ये सध्या विवाह पार पडत आहेत,
एकट्या अहमदनगर जिल्ह्यात एक हजार पेक्षाही जास्त विवाह या पद्धतीने पार पडले आहे. गेल्या अनेक वर्षे भव्य दिव्य लग्न सोहळा करणे हे एक प्रथा झाली आहे.
खोट्या प्रतिष्ठेपाई ऐपत नसतांना लोक भरमसाठ खर्च करतात. ज्यांच्याकडे पैसा आहे ते वारेमाफ खर्च करतात व ते पाहून सर्वसामान्य गरीबालाही थाटामाटात लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
त्यामुळे नाईलाज म्हणून लोक यात भरडले जातात व कर्जबाजारी होतात. हे थांबवण्यासाठी सरकारने कमी लोकांमध्ये लग्नाचा कायदा करावा, अशी मागणी दहातोंडे यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com