Ahmednagar News : शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी (दि.१७) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रितेश सारंगधर पावसे (वय १२) व प्रणव सारंगधर पावसे (वय ८, दोघे, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर), असे शेततळ्यात बुडालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
दोन विद्यार्थी शेततळ्याची शेततळ्यामध्ये बुडाल्याचे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांना माहिती कळविण्यात आली. ही माहिती मिळतात तालुका पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले.
शेततळ्यात बुडालेले दोन्ही भाऊ हिवरगाव पावसा येथील शाळेत शिक्षण घेत होते. मोठा रितेश हा इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत होता. तर लहान प्रणव हा इयत्ता तिसरी मध्ये प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते.
ते सायकलवर खेळत घरापासून काही अंतरावर असलेल्या पाटाच्याकडेला आले. खेळता खेळता पाय घसरला असावा आणि दोघेही शेततळ्यात पडले असा प्राथमिक अंदाज आहे.
शेततळ्यात पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना ठाव लागला नाही. पाणी नाका तोंडात गेले. यामुळे त्यांचा मृत्यू झाला