अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी पुढाकार घेत आपल्या मतदार संघामधील अनेक समस्या सोडवण्याचा धडाकाच लावलेला आहे. त्यांनी कर्जत तालुक्यामधील अनेक समस्यांचे वैयक्तिक लक्ष देत त्यांची सोडवणूक केली आहे.
त्यामुळे अनेक प्रश्न सुटले असून सुटलेल्या प्रश्नांची घोषणा होण्याची औपचारिकता राहिली असल्याची माहिती आ. पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली.
कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक येथील श्रीराम मंगल कार्यालयामध्ये झाली. यावेळी तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर,
युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन धांडेआदीसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी आ. पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी नात्याने माझ्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्याचे काम माझी जबाबदारी आहे.
त्यांचे निराकरण करून जनता सुखी करणे हे उद्देश्य ठेऊन अनेक समस्यांचा सातत्याने पाठपुरावा केला असून यामुळे हे प्रश्न सुटले आहेत. केवळ त्याच्या घोषणेची औपचारिकता आहे.
यात कर्जत एसटी आगार मंजूर झाले आहे. यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून याच परिसरात व्यापारी गाळे बांधण्यात येणार आहेत.
याशिवाय स्थानिक युवकांसाठी रोजगार मिळावा म्हणून एमआयडीसी सुरू करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महिला काँग्रेसची तालुकास्तरीय समिती तयार करण्यात येणार आहे.
याच धर्तीवर गावागावांत महिलांची समिती राहणार असून या समितीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येणार असल्याचे आ. पवार यांनी सांगितले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved