महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पार्सल सेवेच्या ठिकाणी माथाडी कायदा लागू करावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- नगर माथाडी मंडळाच्या अंतर्गत येणार्‍या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पार्सल सेवेच्या ठिकाणी माथाडी कायदा 1969 नुसार अंमलबजावणी करण्याच्या

मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडी कार्यालयाचे निरीक्षक एस.सी. देवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनचे शहर जिल्हाध्यक्ष ऋषिकेश ताठे, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष सागर गुंजाळ, राजू पवार, गणेश झीकरे, विशाल मांडे, निखिल ताठे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

माथाडी मंडळाच्या विभागात येणार्‍या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मर्यादित (एसटी) यांचे जितके बस स्थानक आहे. त्या ठिकाणी कामगार पार्सलचे उतराई, चढाई, वाहतूक, थापी ही माथाडी स्वरूपाची कामे करीत आहे.

परंतु परिवहन मंडळाने हे सर्व कामे खाजगी ठेकेदारास दिले आहे. परंतु त्या ठेकेदाराने ही सर्व कामे माथाडी स्वरूपाची असून मालक व कामगारांची नोंद केलेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

परिवहन मंडळ यांची एक मालक म्हणून नोंद करून कामगारांची सुद्धा नोंद करावी, कामगारांची चालवलेली पिळवणूक थांबवावी व माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment