अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-घास कापण्यासाठी चाललो आहे असे सांगून घरातून निघालेले मायलेक घरे परतले नसल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि घटना कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे घडली आहे.
सुवर्णा योगेश आगवन (वय-२६) व नातू आयुश योगेश आगवन (वय-३) असे या मायलेकांचे नाव आहे. या बाबत नातेवाईक व जवळचे व्यक्तींकडे मिळून न आल्याने त्यांच्या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हरवले असल्याची फिर्याद दिली आहे. याबाबत गायब महिलेचे सासरे ज्ञानदेव भागवत आगवन (वय-६०) यांनी नोंद केली असल्याची माहिती मिळते आहे.

गायब झालेल्या महिलेचे सासरे ज्ञानदेव भागवत आगवन यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, आपली सून व नातू हे काल दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्याला घास कापून आणतो म्हणून सांगून गेले होते.मात्र त्यांचा शोध घेऊनही ते मिळून आले नाही. त्या ठिकाणी घास कापून ठेवलेला दिसून आला आहे.
मात्र महिला व मुलगा मात्र बेपत्ता असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचा कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे तपास करीत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved