दुधाला दरवाढ देण्याची सुबुद्धी सरकारला येण्यासाठी पांडुरंगाला दुग्धाभिषेक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुरता मोडला आहे. त्यातच दुधाचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय मोडकळीस येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे सरकारने याकडे लक्ष पुरविण्याची मागणी वारंवार केली जात आहे. खर्चाच्या तुलनेत दुधाला बाजारभाव व प्रतिलिटर १० रूपये अनुदान राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मिळावे,

या मागणीसाठी आता राहुरीत पांडुरंगाच्या मूर्तीला दुग्धभिषेक घालून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रासपचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर यांनी दिली. बाचकर म्हणाले, कोरोनामुळे झालेल्या लाॅकडाऊनने शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाला नाही.

शेतीला जोडधंदा म्हणून ओळख असलेला दुग्ध व्यवसायदेखील अडचणीत सापडला आहे. पशूखाद्य, तसेच दुभत्या जनावरांच्या चाऱ्यावर होणारा खर्च व दुधाला मिळणारा २० रूपये लिटर बाजारभाव यामुळे खर्चाची सांगड बसत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

मागील सरकारच्या काळात पाच रूपये लिटरप्रमाणे अनुदान देऊन दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला होता. आज दुधाचे बाजारभाव ढासळले असल्याने

शासनाकडून प्रतिलिटर १० रूपये अनुदान, तसेच बाजारभाव वाढवून मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. राज्य सरकारने या मागणीची दखल घेऊन तातडीने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी बाचकर यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment