साईंच्या झोळीत पुन्हा लाखोंची भर

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते.

मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान नवीन वर्ष जवळ येत असल्याने साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे.

नुकतेच चंदीगड येथील तृतीयपंथी समाजाच्या साईभक्त सोनाक्षी व त्यांच्या 10 सहकार्‍यांनी नुकतीच श्री साईबाबा संस्थानला रोख स्वरुपात 11 लाख रुपये देणगी दिली आहे.

याप्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी त्यांचा सत्कार करुन आभार मानले. दरम्यान गेल्या 14 दिवसांत दिवसात कोरोनाच्या संकटात सुमारे अडीच लाख लाख भाविकांनी साईंचे दर्शनच लाभ घेतला.

यावेळी भाविकांनी साईबाबांच्या झोळीत तब्बल 3 कोटी 23 लाख 98 हज़ार 208 रुपयांचे विक्रमी दान अर्पण केले आहे . साईचरणी सोनाक्षी व त्यांच्या सहकार्‍यांनी देणगी दिलेली असल्याने

संस्थानकडून दर्शन आरतीचा मोफत पास उपलब्ध असूनही त्यांनी त्यास नम्रपणे नकार देत विहीत मार्गानेच दर्शनरांगेतून दर्शन घेणे पसंत केले.