राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही कोरोनाची बाधा, राहुरी लॉकडाऊन !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- राहुरी शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ६५०, तर मृत्यूचा आकडा २२ झाला. त्यामुळे आठ दिवस लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राहुरीचे आमदार व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

मुंबईत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाअगोदर तनपुरे यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. राहुरी नगरपरिषेदत सोमवारी अधिकारी,

पदाधिकारी व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन आठ दिवस व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, प्रशासन आणि पत्रकारांच्या उपस्थितीत तब्बल अडीच तास चर्चा झाली.

चर्चेत बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, रावसाहेब तनपुरे, माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे,

देवेंद्र लांबे, विजय डौले, वैभव धुमाळ, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, राजेंद्र दरक आदी सहभागी झाले. १० ते १७ सप्टेंबरपर्यंत राहुरी शहरासह तालुक्यात संपूर्ण लॉकडाऊन असेल, अशी माहिती

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment