मंत्री रामदास आठवले ‘हे’ दोन दिवस येणार अहमदनगर जिल्ह्यात !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या २७ व २८ डिसेंबर रोजी नगर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन येथील भीमराज बुध्दविहार येथे बैठक पार पडली.यात मंत्री आठवले यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीस युवक शहराध्यक्ष अमित काळे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, संजय कांबळे,

विजय भांबळ, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, राज्य संघटक मराठा आघाडी सिद्धार्थ सिसोदे, महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर, अविनाश भोसले, दीपक गायकवाड, विशाल कांबळे,

मंगेश मोकळ, महादेव भिंगारदिवे, प्रवीण वाघमारे, राहुल गायकवाड, विशाल साबळे, सुशील साळवे, विवेक भिंगारदिवे, प्रवीण चाबुकस्वार, राजू जगताप आदी उपस्थित होते.

बैठकीची सुरुवात भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आले. या बैठकीत मंत्री रामदास आठवले यांचा २५ डिसेंबरचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe