अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाने राहुरी तालुक्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय अधिकार्यांनी सर्व पिकांचे व नुकसानीचे पंचनामे त्वरित करून एकही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही,
याची दक्षता घ्यावी, असे आदेश राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत. जास्त पावसामुळे पाणी साचले. सोयाबीन, कपाशी, कांदा, इतर बाजरी व खरिपाची पिके मोठ्या प्रमाणात वाया गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत शासनाच्या अधिकार्यांची तनपुरे यांनी बैठक घेतली.
तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. यातून शेतकर्याला सावरण्यासाठी शासकीय स्तरावर योग्य ती मदत मिळण्या साठी शासनाचे प्रयत्न आहेत. अधिकार्यांनी फक्त कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तहसीलदार फसियोद्दीन शेख, महेंद्र ठोकळे, प्रशांत डहाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीतीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कपाशी, सोयाबीन, बाजरी, मूग घास या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जास्तीच्या पाउसाने डाळिंब फळाचेही नुकसान झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांत जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved