स्वकीयांचा विरोध तरीही मंत्री थोरातांची भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थिती;पाचपुते गटात नाराजी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- नागवडे कारखाना व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे भाजपचे नेते असून त्यांनी श्रीगोंदे शहरात सुरू केलेल्या कोविड केंद्र आणि सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली.

आघाडीच्या नेत्यांना विरोधाला न जुमानता मंत्री थोरात यांनी उद््घाटन केल्याने आघाडीत व भाजपच्या आमदार पाचपुते गटात नाराजी पसरली आहे.

राजेंद्र नागवडे हे भाजपचे नेते असून विधानसभेवेळी राजेंद्र नागवडे यांनी सिद्धटेक तालुका कर्जत येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यांच्या पत्नी काँग्रेसच्या जि. प. सदस्या अनुराधा नागवडे यांनी कर्जत जामखेडमध्ये जाहीर सभा घेऊन माजी पालकमंत्री राम शिंदे यांचा प्रचार केला होता.

त्यामुळे मंत्री थोरात यांनी श्रीगोंद्यात येऊ नये, असे काँग्रेसचे माजी जि. प. सदस्य व रयत कौन्सिलचे सदस्य बाबासाहेब भोस, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार, हेमंत ओगले,

अण्णासाहेब शेलार, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, हरिदास शिर्के, स्मितल वाबळे आदी नेत्यांनी म्हटले होते. तरीही महसूलमंत्री थोरात यांनी भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित दर्शविल्याने आघाडीत व भाजपच्या आमदार पाचपुते गटात नाराजी पसरली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment