जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे कालव्याच्या कामासाठी जलशक्ती मंत्रालयाचा निधी मिळावा – ना. विखे

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या राहिलेल्या कामांसाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील यांच्याकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना ना. विखे पाटील यांनी निळवंडे प्रकल्पाच्या संदर्भात सविस्तर पत्र दिले. जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या सद्यस्थितीची तसेच या धरणासाठी राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कार्यवाहीची माहिती मंत्री विखे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या धरणाचे काम कालव्यांसह पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने ५ हजार १७७ कोटी रुपयांच्या खर्चास मंजूरी दिल्याने धरणाच्या कालव्यांची काम मार्गी लागत आहेत.

मात्र लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचावे, यासाठी आवश्- यक असलेल्या कामांसाठी अधिकच्या निधीची गरज असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. निळवंडे प्रकल्पाच्या पूर्ततेकरीता केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा.

यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जलशक्ती मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर उचित कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून जलशक्ती मंत्रालयाने निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी ना. विखे पाटील यांनी केली आहे.

जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांच्या माध्यमातून लाभक्षेत्रात पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रथम चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतरही उजव्या आणि डाव्या कालव्यातून आवर्तनही सोडण्यात आले होते.

याचा मोठा फायदा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आता होत आहे. राज्याबरोबरच केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचा निधी उपलब्ध झालयस कालव्यांची उर्वरित कामे निर्धारित वेळेत मार्गी लागतील, असा विश्वास मंत्री विखे पाटील पाटील यांनी व्यक्त केला आहे.

निळवंडे कालव्याच्या कामासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहेच. मात्र केंद्र सरकारने अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून आपण लवकरच केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची आपण भेट घेणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe