अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केला होता. यातच कोरोनाच्या दुसर्या लाटेत मृत्यू दर देखील मोठ्या प्रमाणावर वाढला होता.
यातच रुग्णालये आणि राज्य सरकार यांच्याकडून कोविडसंबंधी मृत्यूची चुकीची नोंद केल्यास कोविडविरुद्धचा लढा कमजोर होईल. त्यामुळे मृत्यूचे नेमके चित्र व कारणीमीमांसा करण्यासाठी सरकारने सर्वत्र लेखापरीक्षण हाती घेतले आहे.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा म्हणाले, मृत्यूच्या आकडेवारीपेक्षा त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी हे लेखापरीक्षण हाती घेतले जाते. दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांनी वेळेवर उपचार घेतले नाहीत.
विलगीकरणात न गेल्यानेही मोठे नुकसान झाले. आता जिल्ह्यातील मृत्यूचे लेखापरीक्षण करण्यात आले आहे. यात नोंदविल्या जाणाऱ्या निरीक्षणातून कोविडच्या पुढील संभाव्य लाटेची तयारी करण्यास मदत होणार होईल, अशी अपेक्षा आरोग्य विभाग बाळगून आहे.
या लेखापरीक्षणामुळे मृत्यूच्या संख्येमध्ये बदल होईल. मात्र ही संख्या कमी होणार नसून निश्चितच वाढ नोंदविली जाईल, अशी माहिती डॉ. पोखरणा यांनी दिली.
दरम्यान कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये ३० ते ४५ हा वयोगट बचावला होता. त्यांना कोणताही धोका पोहोचला नाही. दुसऱ्या लाटेमध्ये मात्र या वयोगटाच्या मृत्यूचे प्रमाण जास्त राहिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम