अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात सगळीकडेच विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारांनी अर्ज भरतानाच शक्तिप्रदर्शन करून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
पारनेर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या अर्जांच्या छाननीमध्ये परस्परविरोधी गटांनी आरोप-प्रत्यारोप केल्याने उशिरापर्यंत छाननीची प्रक्रिया सुरू होती.
छाननी प्रक्रियेत १२० अर्ज बाद झाल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. एका ठिकाणी अर्जच न आल्याने तसेच चार गावांमध्ये अर्ज बाद झाल्याने
पाच गावांमधील पाच सदस्यपदे रिक्त राहणार आहेत. संबंधित गावांमध्ये त्याच आरक्षणाचे सरपंचपद जाहीर झाल्यास तेथील सरपंचपदही रिक्त राहण्याची चिन्हे आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved